कथेतील नाट्यमय घटनांचा प्रेक्षकांवर भावनिक परिणाम होत असतो. हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक असा असतो. कथेतील नायकाच्या बाबतीत चांगली घटना घडली तर प्रेक्षकांना चांगले वाटते आणि वाईट घटना घडली तर वाईट वाटते. या चांगले वाईट वाटण्याचा आलेख काढला जातो. कथेतील घटनाक्रमानुसार प्रेक्षकांच्या भावनेत होत जाणाऱ्या अपेक्षित बदलांचा आलेख म्हणजे स्टोरी आर्क! याला प्लॉट पॅटर्न, नरेटिव आर्क, स्टोरी लाईन, स्टोरी मॅप, स्टोरी शेप असेही म्हणतात! आपण याला ‘कथा आलेख’ म्हणू शकतो!