सेट परीक्षा 2023 घटक आठ : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान ईमेलचा इतिहास ईमेल आयडीचे तीन भाग ईमेल लेखनाचे स्वरूप नेव्हिगेशन मेनू ई-मेल चे फायदे ई-मेल चे तोटे 29 ऑक्टोबर 1971 ला ARPANET द्वारे जगातील पहिला ईमेल पाठवला गेला होता, म्हणजेच याच दिवशी ईमेल चा जन्म झाला होता. 1972 मध्ये ARPANET द्वारे जगातील प्रथम ईमेल संगणकावरून संगणकावर पाठविला गेला होता. रे टॉमलिन्सन यांनी तो ई-मेल स्वतः ला चाचणी ई-मेल संदेश म्हणून फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP) च्या प्रणालीनुसार पाठविला होता. ईमेल मॅसेज होता QWERTYUIOP परंतु हा काही विशेष कोड नाही कीबोर्ड वरील ही एक लाईन आहे. रे टॉमलिन्सन यांनी पहिल्यांदा ईमेल मध्ये @ चिन्हाचा वापर केला. म्हणूनच त्यांना ई-मेल चे शोधक म्हटले जाते. 1978 मध्ये विए शिवा अय्यदुरई यांनी एक कॉम्प्युटर प्रोग्राम विकसित केला त्यास ई-मेल म्हटले गेले. त्यात इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर्स, मेमो संलग्नक पर्याय होते. 30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकन सरकारने भारतीय अमेरिकी विए शिवा अय्यदुरई यांना ईमेलचा शोधकर्ता म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. जीमेल ची सेवा सर्वांना वापरण्यासाठी 7 फेब्रुवारी 2007 ला सुरुवात झाली होती. Bcc: ब्लाइंड कार्बन कॉपी बीसीसी म्हणजे अंध कार्बन कॉपी. Cc प्रमाणेच हे एकापेक्षा जास्त लोकांना मेल पाठविण्यासाठी देखील वापरले जाते. परंतु ईमेलद्वारे Cc मध्ये लिहिलेला ईमेल पत्ता Bcc ईमेल पत्ता पाहू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Bcc हा ई-मेल च्या प्रती इतर लोकांना पाठविण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा Cc वापरला जातो तेव्हा आपण प्राप्तकर्त्यांची यादी पाहू शकतो. परंतु Bcc मध्ये प्राप्तकर्त्यांची यादी पाहू शकत नाही. हा या दोघांमधील फरक आहे. All inboxes: जेव्हा कोणी आपल्याला ई-मेल पाठवते तेव्हा ते आपल्या इनबॉक्समध्ये येतात. येथे आपण ते वाचू किंवा हटवू शकतो. Starred: आपल्याला बऱ्याच प्रकारचे ईमेल प्राप्त होत असतात. काही ई-मेल उपयोगाचे असतात तर काही ईमेल उपयोगाचे नसतात. या ऑप्शन द्वारे ईमेल तारांकित (Starred) ठेवून हे स्वतंत्रपणे जतन करू शकतो. Sent: या ऑप्शन मध्ये आपण पाठवलेले सर्व मेल असतात.Schedule: येथे आपण ईमेल पाठविण्यासाठी वेळ सेट करू शकतो.Outbox: आपण एखादा ईमेल पाठवला आणि तो समोरच्या व्यक्तीला अजून पोहोचला नाही तर तो मेल पोहोचायच्या अगोदर या फोल्डर मध्ये दिसतो. पोहचल्यानंतर तो मेल automatically या फोल्डर मधून निघून जातो. विनामूल्य सेवा ईमेल जगातील एक लोकप्रिय विनामूल्य गुगलची सेवा आहे. म्हणूनच ईमेल पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. संप्रेषण साधन ईमेलचे प्रथम कार्य म्हणजे संप्रेषण आणि हे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विकसित केले गेले आहे. प्रभावी साधन ई-मेल चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे जगातल्या कोणत्याही काना कोपऱ्यात वापरले जाणारे प्रभावी साधन आहे. संप्रेषणाची नोंद आपल्या सर्व संप्रेषणाची नोंद प्रदान करतो. कोणाशी काय संवाद साधला आणि त्याने काय उत्तर दिले याची सर्व माहिती आपल्याकडे असते, आपण कधीही ती माहिती पाहू शकतो. प्रिंट आउट देखील काढू शकतो. जोपर्यंत आपण हेतूपूर्वक त्यांना हटवत नाही तोपर्यंत ते आपल्या ईमेल मध्ये सेव्ह असतात. इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.मोठ्या आकाराच्या फाईल पाठवू शकत नाही, त्याला एक मर्यादा आहे.आपण ईमेलमध्ये काही प्रकारच्या फायली पाठवू शकत नाही. जसे exeईमेल स्पॅमचा एक प्रकार आहे.